तेजधार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन, पुणे पोलीस दलात खळबळ.

अमोल तुजारे : पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन, पुणे पोलीस दलात खळबळ, काय आहे प्रकरण?

पुणे : पाच कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन, पुणे पोलीस दलात खळबळ, काय आहे प्रकरण?

दोन दिवसांपूर्वी शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकावणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पुणे पोलीस दलातील ५ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.

पुणे गुन्हेगारी वृत्त:
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी चर्चेचा विषय ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकावणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशातच आता मोठी बातमी समोर आली असून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पुणे पोलीस दलातील ५ कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी शरद मोहोळ (Sharad Mohol) याची पत्नी स्वाती मोहोळ यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. या प्रकरणाने चांगलीच खळबळ उडाली होती. यावेळी पोलीस शिपाई निखिल पासलकर आणि पोलीस शिपाई पोपट खाडे हे दोघे ही सायबर पोलीस विभागात कार्यरत होते. याच २ पोलीस कर्मचाऱ्यांच्या रखवालीतून मार्शल लीलाकर या आरोपीने पळ काढला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कर्तव्यात कसूरी केल्याचा ठपका ठेवत या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
दुसऱ्या प्रकरणात, काही दिवसांपूर्वी पुण्यातील मगरपट्टा पोलीस चौकीत एका महिलेला पोलीसांकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता पोलीस दलातील ३ जणं दोषी असल्याचे आढळून आले. यामुळे हडपसर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मगरपट्टा पोलीस चौकीत कार्यरत असणाऱ्या एक अधिकारी आणि २ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

Tezdhar News

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे