तेजधार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

ढोणे सर्विस सेंटरने गायब केलेले वाहन स्वारगेट पोलिस स्टेशन ला!

अमोल तुजारे

पुणे : ढोणे सर्विस सेंटरने गायब केलेले वाहन स्वारगेट पोलिस स्टेशन ला!
पवन परदेशी यांच्या मालकीची बुलेट दुचाकी वाहन ०७ डिसेंबर रोजी मार्केट यार्ड येथील ढोणे सर्विसिंग सेंटर मध्ये सर्विसिंग साठी दिली असताना ढोणे सर्विसिंग सेंटर ने गाडीचे सर्विसिंग न करता १० डिसेंबर रोजी आपल्या संबंधित असलेल्या IDFC बँकेशी सल्ला मसलतीने गायब केली होती त्याची माहिती पवन परदेशी यांनी १० डिसेंबर रोजी ११२ नंबर वर पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले होते व रिपब्लिकन मातंग सेनेकडे कायदेशीर मदत मिळण्यासाठी तक्रार दिली होती याची दखल स्वारगेट पोलिसांनी घेतली आणि स्वारगेट पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. सुनील झावरे सर यांनी तपास अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल कोळंबीकर यांची नियुक्ती केली आणि गुन्ह्य़ाचा तपास त्यांच्या कडे सोपविण्यात आला तपास अधिकारी यांनी तपास सुरू केला तेव्हा ढोणे सर्विस सेंटरने गायब केलेली बुलेट दुचाकी वाहन २२ डिसेंबर रोजी ढोणे
सर्विस सेंटरने स्वारगेट पोलिस स्टेशन ला आणून दिली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल कोळंबीकर यांनी सदर दुचाकी वाहन पवन परदेशी यांना २२ डिसेंबर रोजी तपास अधिकारी राहूल कोळंबीकर यांनी त्यांच्या हस्ताक्षरात पवन परदेशी यांचा जबाब नोंदवून सही घेतली आणि सुर्य मावळल्यानंतर दुचाकी स्वारगेट पोलिस स्टेशन मध्ये पवन परदेशी यांना सुपूर्द केली आहे आणि पुढील तपास चालूच असून ढोणे सर्विस सेंटरचे सर्व दोषी संशयितांचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यासाठी स्वारगेट पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कायदे तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे असे तोंडी सांगितले असल्याचे कळविले आहे तसेच ढोणे सर्विस सेंटर चे मालक संतोष ढोणे आणि त्यांचे सर्व सहकारी दोषींविरुद्ध प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यासाठी माझी कायदेशीर तक्रार आहे अशी माहिती पवन परदेशी यांनी तेजधार न्यूज शी बोलताना दिली आहे.
तरी ढोणे सर्विस सेंटर चे मालक संतोष ढोणे आणि त्यांचे सर्व दोषी समर्थक / सहकारी यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यासाठी मंगळवार दिनांक २६ डिसेंबर रोजी स्वारगेट पोलिस स्टेशन समोर तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे तरी सदर आंदोलनात ढोणे सुझुकी शोरूम व सर्विस सेंटर कडून कोणत्याही प्रकारची फसवणूक, दरोडे, खंडणीसाठी वाहनांचे अपहरण, चोरी, लुटमारीच्या तक्रारी असतील अशा ग्राहकांनी ढोणे यांचे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन रिपब्लिकन मातंग सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल तुजारे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tezdhar News

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे