तेजधार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

वाहनचोरी करणारे चार सराईत चोर वानवडी पोलीसांकडून जेरबंद

अमोल तुजारे

वाहनचोरी करणा-या चार सराईत चोरांना वानवडी पोलीसांनी अटक केली
त्यांचेकडुन चोरीच्या तब्बल ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या. वानवडी पोलीस ठाणेचे तपास पथक प्रभारी सहा. पोलीस निरिक्षक जयवंत जाधव, पोउनि भोसले व पो. अंम संतोष नाईक, सर्फराज देशमुख, विनोद भंडलकर, निलकंठ राठोड असे पोलीस ठाणे हदीत वारंवार घडत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करुन गुन्हेगारांना अटक करणेबाबत मा. वरिष्ठ अधिकारी यांनी वाहन चोरीचे हॉट स्पॉट तयार करुन सदर ठिकाणी सापळे लावणेबाबत दिलेल्या सुचना व आदेशान्वये सतर्कतेने पेट्रोलिंग करीत असताना पो. अंम सर्फराज देशमुख व निलकंठ राठोड त्यांना त्यांचे बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, काही तरुण पुणे शहर परिसरांतून वाहन चोरी करून ती वाहने पुण्याचे बाहेरील जिल्हयात त्याची विक्री कामी नेणार असलेल्या मिळालेले बातमीवरून वानवडी पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांनी सदर भागांत सापळा रचून खालील आरोपींना ताब्यात घेवून अटक करण्यात आलेली आहे.
१) सुरज श्रीकांत कांबळे, रा. तरवडेवस्ती, महंमदवाडी चौकीचे मागे, महंमदवाडीरोड, पुणे. सध्या,
मु.पो. कानाडी बोरगाव. (मांगवाडा) ता. लातुर, जि. लातुर, २) गणेश बबन लोंढे, रा. तरवडेवस्ती, महंमदवाडी चौकीचे मागे, महंमदवाडीरोड, पुणे ३) अनिकेत ऊर्फ मॉन्टी शरद माने, रा. घनलक्ष्मी सुपर मार्केट शेजारी, साठेनगर चौक, तरवडे वस्ती, महंमदवाडी, पुणे, (४) भिमाशंकर ऊर्फ मिमा हरिभाऊ लाळगे, रा. घर नं.०६. गल्ली नं.०३. आनंदनगर, तरवडेवस्ती.. महंमदवाडी, पुणे
आरोपींना वानवडी पो.स्टे. गु. रजि. नं. १५३/२०२२ भा.दं.वि. कलम ३७९.३४ गुन्हयांत अटक करुन नमूद आरोपींनी चोरी केलेली एकुण ३,०१,०००/- रु. कि. चे ११ वाहने जप्त केलेली आहेत. त्याबाबत दाखल असलेले वानवडी पोलीस ठाणेकडील ४ गुन्हे, हडपसर पोलीस ठाणेकडील २ गुन्हे व कोंढवा पोलीस ठाणेकडील २ गुन्हे तसेच मुरुड पोलीस ठाणे जिल्हा लातुर येथील १ गुन्हा असे एकुण ९ गुन्हे उघडकीस आणले असुन २ वाहनांबाबत अधिक तपास चालु आहे.
आरोपी १ व ४ हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर यापूर्वी वाहनचोरी व शरिराविरुध्दचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी क्र ३ अनिकेत ऊर्फ मॉन्टी शरद माने हा मोका मधुन जामीनावर सुटलेला असुन त्यास पुणे शहरात येण्यास बंदी आहे. तसेच आरोपी क्र ४ भिमाशंकर ऊर्फ भिमा हरिभाऊ लाळगे हा कोंढवा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ११००/२०२१ मा. दं.वि. कलम ३९३.३४१, ५०४,३४ आर्म अॅक्ट ४(२५) ३७(१) (३) सह १३५ या गुन्हयामध्ये अटक होता. सदरची कारवाई ही मा. नम्रता पाटील, पोउआ परिमंडळ ५ पुणे शहर व मा. पौर्णिमा तावरे, स. पोआ वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिपक लगड, पोलीस निरिक्षक गुन्हे संदिप शिवले व तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले, सहा.पो. फौज, संतोष तानवडे, संतोष नाईक, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, राहुल गोसावी, निलकंठ राठोड, संदीप साळवे, अमोल गायकवाड, विष्णु सुतार यांनी केली आहे. तसेच दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले हे स्वतः करीत आहेत.

Tezdhar News

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे