पुण्यात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चा वर्धापन दिन साजरा.
बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टीचा 10 वा वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न, व मान्यवर कांशीराम साहेब यांचा स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

पुणे : बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टीचा 10 वा वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न, व मान्यवर कांशीराम साहेब यांचा स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन,
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहराच्या वतीने गोरगरिबांना मिठाई वाटून पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तसेच रास्तापेठ येथील बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पुणे शहर तसेच पश्चिम महाराष्ट्र संपर्क कार्यालयात बहुजनांचे नेते माननीय कांशीराम साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे पुणे शहराध्यक्ष अमोल तुजारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले,
यावेळी रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे सचिव अभय शेलार ए एस साबळे, हिरामण गायकवाड, भारत गायकवाड, अक्षय गायकवाड, भागवत कांबळे, शार्दुल कांबळे, अॅड. अंबादास बनसोडे आदि यावेळी उपस्थित होते.



