पुण्यात गंगाधाम चौकामध्ये महाड सत्याग्रह दिनानिमित्त पाणपोईचे उद्घाटन
अमोल तुजारे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च १९२७ रोजी झालेल्या महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या स्मरणार्थ दि. २९ मार्च २०२६ रोजी पुण्यातील गंगाधाम चौक येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवी हक्कांच्या लढ्याचे प्रतीक होता.

पुणे,
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च १९२७ रोजी झालेल्या महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या स्मरणार्थ दि. २९ मार्च २०२६ रोजी पुण्यातील गंगाधाम चौक येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवी हक्कांच्या लढ्याचे प्रतीक होता.
याच पार्श्वभूमीवर मार्केटयार्ड येथील गंगाधाम चौकात रविवार, २९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पाणपोईचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेब यांच्या प्रेरणेतून होणार असून, त्यांच्या प्रेरणेतून पोलीस उप आयुक्त मिलिंद मोहिते यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. पुणे शहर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक नेते वसंतदादा साळवे असणार आहेत. तसेच मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा उपक्रम रिपब्लिकन मातंग सेना, महाराष्ट्र प्रदेश, युवा विकास कला क्रीडा प्रतिष्ठान आणि मदर टेरेसा सार्वजनिक ग्रंथालय वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने अमोल तुजारे यांनी आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाद्वारे समाजात समानता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.



