तेजधार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीसंपादकीय

सुपेकरांसोबत अमिताभ गुप्तांचा पाय खोलात; अजित पवार..

अमोल तुजारे : सुपेकरांसोबत अमिताभ गुप्तांचा पाय खोलात; अजित पवारांनी दिला इशारा अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्त असताना ५०० ते ५५० शस्त्र परवाने दिल्याची माहिती

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात बड्या अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपातून करण्यात आलेले गैरकारभार दिवसगणिक उघड होत आहेत. या प्रकरणामुळं अडचणीत आलेले पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यासह तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे आणखी पाय खोलात गेलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररीत्या शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी दोघांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शस्त्र परवान्यासंदर्भात विशेष सूचना दिल्या आहेत.

पुण्यात शस्त्र परवाने देताना अनेक वेळा गरज नसलेल्या व्यक्तींनाही परवाने देण्यात आले आहेत. काही प्रकरणांमध्ये शस्त्र परवाना नाकारल्यानंतरही राजकीय ओळख वापरुन परवाना मिळवला गेला. अशा सर्व प्रकरणांची चौकशी करुन योग्य ती कठोर कारवाई केली जाईल असे अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच, अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्त असताना ५०० ते ५५० शस्त्र परवाने दिल्याची माहिती आहे. या सर्वा परवान्यांची सखोल चौकशी सुरु असून संशयास्पद शस्त्र परवान्याचा फेर आढावा घेण्याचा सूचना पवारांनी दिल्या आहेत.

अजित पवार म्हणाले, मी बीड जिल्ह्यात अशा पद्धतीने देण्यात आलेल्या परवान्यांची माहिती घेत आहे. त्यातील बहुतांश शस्त्र परवाने देण्याच्या योग्यतेचे नव्हते. त्यामुळे ते रद्द करण्यात आलेत. मी पुण्याच्याही दोन्ही सीपी व एसपींना यासंबंधीचा फेरआढावा घेण्याची सूचना केली आहे.

तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या अधिकारात ओव्हररूल्ड करून परवाना दिल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. अशा प्रकारे ज्या काही घटना घडल्या आहेत, त्यांचा फेरआढावा घेतला जाईल. त्यात काही लोकांना गरज नसतानाही शस्त्र परवाना देण्यात आल्याचे निष्पन्न झाले, तर तो परवाना रद्द केला जाईल.

Tezdhar News

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे