तेजधार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

संपादकीय

पुण्यात महाड चवदार तळे सत्याग्रह स्मरण दिनानिमित्त पानपोई उपक्रम

अमोल तुजारे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च १९२७ रोजी झालेल्या महाड चवदार तळे सत्याग्रह या ऐतिहासिक लढ्याच्या स्मरणार्थ पुण्यात सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने पुणे शहरातील गंगाधाम चौक, मार्केट यार्ड येथे पानपोई उद्घाटन सोहळा पार पडला.

पुणे, — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २० मार्च १९२७ रोजी झालेल्या महाड चवदार तळे सत्याग्रह या ऐतिहासिक लढ्याच्या स्मरणार्थ पुण्यात सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने पुणे शहरातील गंगाधाम चौक, मार्केट यार्ड येथे पानपोई उद्घाटन सोहळा पार पडला.

या कार्यक्रमातून पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेब यांच्या वतीने संवेदनशीलता, सामाजिक ऐक्य, मानवता आणि समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुणे शहराचे पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. पानपोईचे उद्घाटन पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२ मा. मिलिंद मोहिते यांच्या हस्ते होणे अपेक्षित होते; मात्र काही कारणास्तव त्यांनी कार्यक्रमास अनुपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. वसंतदादा साळवे (शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते) यांनी भूषविले. यावेळी मार्केट यार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. विश्वजीत जगताप, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच अॅड. अंबादास बनसोडे, अॅड. तोसीफ शेख, अॅड. सुरेंद्र जानराव, अॅड. प्रज्ञा साळवी, अनिल हातागळे, दत्ता जाधव, रणजीत वडागळे, विल्सन पाखरे, प्रितम वाघमारे, भागवत कांबळे, आकाश जगताप, राजकुमार वडागळे, उज्ज्वला साळवी, सोनिका तुजारे, प्रसन्न साळवी प्रवीण वाघमारे. आणि इतर सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर पोलीस, रिपब्लिकन मातंग सेना (महाराष्ट्र प्रदेश), युवा विकास कला क्रीडा प्रतिष्ठान आणि मदर टेरेसा सार्वजनिक ग्रंथालय वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. आयोजनाची जबाबदारी अमोल तुजारे यांनी पार पाडली.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत अमोल तुजारे यांनी केले. हा उपक्रम समाजात समानता, बंधुता आणि मानवतेचा संदेश पोहोचविणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Tezdhar News

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे