तेजधार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

पुणे काँग्रेस भवनात भाजप कडून राडा

अमोल तुजारे : रिपब्लिकन मातंग सेना, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने कळविण्यात येते की, पुणे शहरातील काँग्रेस भवन येथे भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात बेकायदेशीरपणे प्रवेश करून दगडफेक केली. या घटनेत काँग्रेस भवनातील कार्यकर्त्यांच्या डोक्यावर दगडफेक होऊन ते जखमी झाले आहेत.

पुणे.

रिपब्लिकन मातंग सेना, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने कळविण्यात येते की, पुणे शहरातील काँग्रेस भवन येथे भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात बेकायदेशीरपणे प्रवेश करून दगडफेक केली. या घटनेत काँग्रेस भवनातील कार्यकर्त्यांच्या डोक्यावर दगडफेक होऊन ते जखमी झाले आहेत.

सदर घटना पोलीसांच्या उपस्थितीत घडल्याची माहिती मिळाली असून, कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर भंग झाला आहे. या वेळी संवैधानिक पदावर असलेले पुणे शहराचे महापौर देखील घटनास्थळी उपस्थित होते, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.

लोकशाही व्यवस्थेत अशा प्रकारची हिंसक कृत्ये अमान्य असून, यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी रिपब्लिकन मातंग सेनेचे अध्यक्ष अमोल तुजारे यांची ठाम मागणी आहे.

रिपब्लिकन मातंग सेना महाराष्ट्र प्रदेश या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत असून न्याय मिळेपर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

Tezdhar News

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे