पुणे ग्रामीण तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलीस तपास सुरू
अमोल तुजारे : पुणे ग्रामीण तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलीस तपास सुरू असल्याचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गील यांची आंबेडकरी चळवळीतील प्रमुख पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहिती दिली.

पुणे : ग्रामीण भागातील खंडाळा माथ्याजवळ रांजणगाव गणपती हद्दीमध्ये एक महिला व तिचे दोन लहान मुलांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांची हत्या करून त्यांना पेटवून दिलेले आहे. त्या महिलेच्या हातावर “जय भिम” गोंदवलेले असताना तिच्यासहित तिच्या लहान मुलगा वय वर्ष ४ व दुसरा मुलगा अंदाजे दीड वर्ष असलेला त्यांची हत्या करून पेटवून देण्यात आलेले आहे. आज या घटनेला तीन दिवस होऊन देखील अध्यापही या घटनेचा छडा लागलेला नाही. आरोपींना अटक करण्यात आले नाही. हत्या कोणत्या कारणाने झालेले आहे याची माहिती मिळाली नाही. पोलिसांनी या तेहरी हत्याकांड संबंधित गांभीर्याने तपास केलेला नाही त्यामुळे आरोपी मोकाट सुटलेले आहे .अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत सदर घटना कशामुळे व कोणत्या कारणामुळे घडले आहे हे समाज नागरिकांपुढे येणे अतिशय गरजेचे असल्यामुळे आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल भेटून आंबेडकरी चळवळीतील प्रमुख पक्ष संघटनेच्या वतीने निवेदन सादर केले. यावेळी गील यांनी तपास अधिकाऱ्यांना फोनवरून माहिती घेऊन योग्य त्या सूचना दिल्या व या संदर्भात लवकर याचा उलगडा करण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले.या रिपब्लिकन संघर्ष दलाचे अध्यक्ष संजयजी भिमाले, रुग्ण हक्क परिषदेचे उमेश चव्हाण , बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी BRSP चे पुणे शहर अध्यक्ष अमोल तुजारे,भिम छावा संघटनेचे अध्यक्ष शाम गायकवाड, अनिकेत पालखे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



