पुणे.
मंगळवार सायंकाळी ०७:०० वाजताच्या सुमारास पुणे नाना पेठ येथील संत कबीर चौकामध्ये पुणे महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या बस बंद पडल्यावर दुरूस्ती व देखभाल करण्यासाठी असलेल्या ब्रेक डाऊन बस ने अचानक पेट घेतला या वेळी फायर ब्रिगेड व पोलीस मदतीसाठी पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले पोलीस नियंत्रण कक्षाने मराठा आरक्षण आंदोलनातील काही प्रकार आहे का या बाबतीत चौकशी केली असता रिपब्लिकन मातंग सेनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल तुजारे यांनी या घटनेशी मराठा आरक्षण आंदोलनाचा काही एक संबंध नाही असे पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले व पोलीस मदत मिळाली तसेच सदर घटनेमुळे प्रसंगावधान राखून वेळीच मदत मिळाली त्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही.



