पुणे
शुक्रवारी रात्री २१:०० वाजताचे सुमारास विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विलास सोंडे, मा. पोलीस निरीक्षक, गुन्हे, श्री. मंगेश जगताप पोलीस उप निरीक्षक श्री रविंद्र बावरे व तपास पथकातील स्टाफ असे पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोना सचिन जाधव व सचिन कदम यांना त्यांचे बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, पोरवाल रोड, डि. वाय. पाटील, कॉलेज जवळ, टि जंक्शन समोर, मोकळ्या मैदानात एक इसम थांबलेला असुन त्याचेकडे पिस्टल व राऊंड असुन तो कोणाची तरी वाट पाहत आहे. त्याप्रमाणे सदरची बातमी श्री. विलास सोंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांना कळविली असता, त्यांनी बातमीची खात्री करुन शहानिशा करुन कारवाई करा असे तोंडी आदेश दिले. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक ढावरे व स्टाफ यांनी सापळा लावुन इसम नामे रामकृष्ण विश्वास भोंडवे वय ३८ वर्षे मुळ पत्ता गणेश हौसीग सोसायटी, चिंचवड, पुणे यास पकडले असता त्याचेकडे ९१,०००/- रुपये किंमतीचे ०२ गावठी बनावटीचे पिस्टल व ०६ जिवंत राऊंड मिळुन आले असुन ते जप्त करण्यात आलेले आहेत. सदर इसमाविरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ४१० / २०२२ शस्त्र अधिनियम १९५२ कलम ३ २५ व महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदरचा पिस्टल कोठून व कशासाठी आणले होते याबाबत पुढील तपास पोलीस उप निरीक्षक श्री. रविंद ढावरे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. श्री. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. संदिप कर्णिक, सह आयुक्त, पुणे शहर मा. श्री. नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. श्री. रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त परिमंडळ ०४ पुणे शहर, श्री किशोर जाधव सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर यांचे आदेशान्वये श्री. विलास सोंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर व श्री मंगेश जगताप पोलीस निरीक्षक (गुन्हे) विमानतळ पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढावरे पोलीस स्टाफ अविनाश शेवाळे, गणेश साळुंके, सचिन कदम, सचिन जाधव, रुपेश पिसाळ, नाना कर्चे, योगेश थोपटे, रुपेश तोडेकर यांचे पथकाने केली आहे.



