तेजधार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

पोलिसांनी मुलींना जातीवाचक शिवीगाळ केली नाही, अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करता येणार नाही, पुणे पोलिसांचे बेकायदेशीर पत्र

अमोल तुजारे

पुणे : तेजधार न्यूज| मुलीच्या तक्रार अर्जाचे अवलोकन केले असता प्रथमदर्शनी घडलेली घटना ही वस्तुस्थितीवर आधारित नसून यामध्ये तथ्य दिसून येत नाही. त्यामुळे अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होत नसल्याचे पत्र कोथरुड पोलिसांनी मुलींना दिले आहे. पहाटे अडीच वाजता पोलीस आयुक्तालयात (तेजधार न्यूज) धरणे धरुन बसलेल्या मुलींना कोथरुड पोलिसांनी हे पत्र दिले आहे.

घरातून पळून आलेली एक महिला एक दिवस कोथरुडमधील या मुलींच्या घरी राहिली होती. या कारणावरुन छत्रपती संभाजीनगर पोलीस पुण्यात आले होते. त्यांनी कोथरुड पोलिसांच्या मदतीने या मुलींच्या खोलीवर वॉरंट नसताना छापा घातला. त्यांच्या सर्व सामानाची तपासणी केली. त्यांना कोथरुड पोलीस ठाण्यामधील सीसीटीव्ही नसलेल्या खोलीमध्ये पाच तास बसवून ठेवले. तेथे त्यांना मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप या मुलींनी केला होता.

या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करुन गेले दोन दिवस या मुली आंदोलन करीत आहेत. आमदार रोहित पवार, सुजात आंबेडकर, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे यांनी सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या मुली रात्रभर पोलीस आयुक्तालयात धरणे धरुन बसल्या होत्या.

पहाटे २ वाजता या मुलींकडून तक्रार अर्ज घेण्यात आला. नियमानुसार गुन्हा दाखल करून न घेता त्यानंतर पहाटे अडीच वाजता कोथरुड पोलिसांनी त्यांच्या तक्रार अर्जाला उत्तर दिले. त्यात पोलिसांनी म्हटले आहे की, आपल्या पत्रानुसार तक्रारीचे अवलोकन केले असता प्रथमदर्शनी घडलेली घटना/घटनाक्रम हे वस्तुस्थितीवर आधारित नसून प्रथमदर्शनी यामध्ये तथ्य दिसून येत नसल्यामुळे भारतीय न्याय संहिता/अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ अंतर्गत दखलपात्र गुन्हा होत नसल्याचे दिसून येत आहे, असे पत्र देण्यात आले आहे.

याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी केलेल्या तपासात पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ केलेली नसल्याचे दिसून आल्याने अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होत नाही.

Tezdhar News

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे