तेजधार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

राजकिय

आनंदनगर झोपडपट्टी मध्ये अंधार हे स्थानिक तत्कालीन असलेले भाजपचे व राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी नगरसेवक यांचे पाप

अमोल तुजारे

पिंपरी चिंचवड :
“आनंदनगर झोपडपट्टी मध्ये अंधार हे स्थानिक तत्कालीन असलेले भाजपचे व राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी नगरसेवक यांचे पाप ।”

आनंदनगर झोपडपट्टी ही पिंपरी चिंचवड शहरातील पहिली घोषित झोपडपट्टी असून सदर परिसरात मोल मजूरी करणारा कामगार वर्ग तसेच घरकाम करणाऱ्या महिला कचरावेचक वर्ग अधिक प्रमाणात राहत आहे. सदर परिसरात महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यातील अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समाजातील लोक राहत असून सदर परिसर हा अत्यंत दाट वस्तीचा आहे. आनंदनगर परिसरात गेल्या १५ वर्षामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजप या पक्षाचे नगरसेवक राहिलेले असून त्यांच्या काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना या नगरसेवकानी कोणतेही झोपडपट्टी पुनर्वसनाचे व मूलभूत आणि पायाभूत सुविधानकडे लक्ष दिलेले नाही. संबंधित पक्षांच्या नगरसेवकांनी नागरिकांना संभ्रमित केल्याने कोणीही वीज बिल भरले नाही त्याच प्रमाणे वीजपुरवठा जोडणी मध्ये अधिकृत नियमित्तता आणि आवश्यक ती जागृती करणे गरजेचे होते परंतु तसे न केल्याने याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्र राज्य वीज विदयुत वितरण कंपनीने आनंदनगर झोपडपट्टी परिसरातील विजजोडणी कट करून वीजपुरवठा खंडित केलेला आहे. त्यामुळे आनंदनगर झोपडपट्टी परिसर जवळपास १ महिन्यापासून अंधारमय झालेला आहे. त्या परिसरातील नागरिकांना दैनंदिन कामे करणे देखील अवघड झालेले आहे म्हणून सदर परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढन्याची शक्यता आहे. सध्या महानगर पालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहत असताना श्रेयवादासाठी नागरिकांची दिशाभूल करून आपल्या झालेल्या चुका झाकण्यासाठी तोच प्रश्न उपोषणाचे हत्यार वापरुन राजकीय स्टंट करीत आहेत सध्या शालेय विद्यार्थ्यांचे परीक्षा एरणीवर आलेले असताना परिसरात अंधार झाल्याने अभ्यास करणे अवघड झाले आहे त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचे भवितव्यदेखील अंधारातच जाणार आहे. या राजकीय स्टंटला नागरिकांनी भुलून न जाता सावध राहावे. त्याच प्रमाणे स्थानिक आमदारांनी त्यांच्या निधीतून रोहित्र (Transformer) व डि पी (distribution Panel) बसवावे. नागरिकांना वेठीस धरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये. आनंदनगर झोपडपट्टी परिसरातील वीजपुरवठा हा अखंडित करून सुरळीत करण्यात येऊन नागरिकांचे प्रश्न सोडवावा.

असे पत्रक बहुजन समाज पक्षाचे सुशील गवळी यांनी प्रसिद्धीस दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की बहुजन समाज पक्ष जनतेच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध आहे आणि आम्ही आनंदनगर झोपडपट्टीतील अंधारात असलेल्या नागरिकांना प्रकाशात आणण्याचे काम बहुजन समाज पार्टी पिंपरी-चिंचवड शहर कमिटीच्या वतीने करण्यात येणार आहे.”

Tezdhar News

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे