तेजधार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारी

गंगाधाम चौकातील सार्वजनिक पानपोई चोरीला; नागरिकांकडून संताप व्यक्त

अमोल तुजारे : मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौक येथे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ठेवण्यात आलेली सार्वजनिक पानपोई अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे – मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौक येथे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ठेवण्यात आलेली सार्वजनिक पानपोई अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गंगाधाम चौक हा मार्केट यार्ड परिसरातील अत्यंत वर्दळीचा भाग असून येथे दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिक, प्रवासी तसेच कामगारांची ये-जा असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी ही पानपोई ठेवण्यात आली होती. मात्र अज्ञात व्यक्तींनी ती चोरी करून नेल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

सार्वजनिक उपयोगासाठी ठेवलेल्या सुविधांची चोरी होणे ही अत्यंत गंभीर बाब असून यामुळे समाजातील सार्वजनिक सुविधांबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित चोरट्यांचा शोध घ्यावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

तसेच गंगाधाम चौक येथे तात्काळ नवीन पानपोई बसवून नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणीही पुणे महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे.

Tezdhar News

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे