तेजधार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

राजकिय

पुणे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

अमोल तुजारे २१५- कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलीस निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली आहे.

पुणे, दि. ६ : जिल्ह्यातील २१५- कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलीस निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली आहे.

निवडणूक निरीक्षक म्हणून निरज सेमवाल यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-१०५ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९४०४५४२४०९ असा आहे.

निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून अश्विनीकुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-२०६ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ८२७५९६९५०० असा आहे..

निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून मंझरुल हसन यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-३०४ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ८२७५९६९५०४ असा आहे.

निवडणूक निरीक्षक कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२०-२९९७२५४६ असा आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा निवडणूक शाखेतर्फे कळविण्यात आले आहे.

Tezdhar News

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे