अंमली पदार्थ विरोधी पथक दोन गुन्हे शाखेची कारवाई कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
अमोल तुजारे
पुणे. अंमली पदार्थ विरोधी पथक ०२. गुन्हे शाखेची दमदार कामगिरी कोंढवा येथे छापा टाकुन किंमत रुपये ८,७१,९६०/- रुपये किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य पान मसाला व गुटखा अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ गुन्हे शाखेच्या च्या स्टाफने पकडला
अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस उप निरीक्षक एस डी नरके तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील अंमलदार हे परिमंडळ ५ मधील कोंढवा पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक १४/१०/२०२२ रोजी ०८/०० वा पासुन पेट्रोलींग करीत असताना पोलीस हवालदार चेतन गायकवाड यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, येवलेवाडी ते खड़ी मशिन चौक दरम्यान इसम नामे सिराज नुरआलम मनसुरी वय २९ वर्षे रा रा.न.४२ नुर मश्जिद जवळ कोंढवा पुणे हा सिल्व्हर रंगाचा टेम्पो क्रमांक एम एच १२ टी व्ही ७६१६ यामधुन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य पान मसाला व गुटखा याची पोती विक्री करीता घेऊन जाणार आहे. त्याप्रमाणे मिळालेल्या बातमी वरुन अंमली पदार्थ विरोधी -०२ शाखेचे पथक, अधिकारी व अंमलदार यांनी वरील परीसरात सापळा लावला असता दांडेकरनगर सिंहगड कॉलेज जवळ येवलेवाडी कोंढवा पुणे येथे सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम नामे सिराज गुरआलम मनसुरी वय २२ वर्षे रा स.न.४२ नुर मश्जिद जवळ कोंढवा पुणे हा सिल्व्हर रंगाचा टेम्पो क्रमांक एम.एच.१२ टी. व्ही. ७६१६ घेऊन येत असताना त्यास ताब्यात घेऊन त्याचे व त्याचे ताब्यातील टेम्पोची झडती घेतली असता टेम्पो मध्ये ४,२३,३६० /- रू कि चा तंबाखुजन्य पान मसाला व गुटखा २) ५,००,०००/- रु कि च्या टेम्पो एम.एच.१२ टी. व्ही. १७६१६ जप्त करुन त्याचेकडे तपासा दरम्यान चौकशी करून त्याने बोपगाव ता पुरंदर येथे असलेले गोडाऊनमध्ये अणखीन माल ठेवला असलेबाबत सांगीतलेने सदर गोडाऊन येथे छापा कारवाई करुन ४,४८,६००/- रुपये किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले तंबाखुजन्य पदार्थ, पानमसाला व गुटखा जप्त करण्यात आला आहे.
आरोपीकडुन एकुण किं.रु.१३,८१,९६०/- रुपयांचा ऐवज त्यामध्ये एकुण ८.७१,९६०/- रुपये किंमतीचा तंबाखुजन्य पान मसाला व गुटखा व ५,००,०००/- रू कि च्या टेम्पो एम.एच.१२/ टी / व्ही ७६१६ जप्त करुन त्याचे विरुध्द पोहवा चेतन गायकवाड यांनी कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. १०३१ / २०२२ भादवि कलम ३२८, १८८, २७२,२७३, सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियम कलम ७ (२) व २० (२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६ चे कलम २६ (२) (i) (iv) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उप निरीक्षक दिगंबर चव्हाण यांनी सदरचा तंबाखुजन्य पान मसाला व गुटखा जप्त केला असुन दाखल गुन्हयाचा तपास स्वतः करत आहेत.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहा पो आयुक्त गुन्हे २ श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, २ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे पोलीस उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस उप-निरीक्षक एस डी नरके, पोलीस अंमलदार पो. हवा. संतोष देशपांडे, पो.हवा, प्रशांत बोमादंडी, पो. हवा. संदिप जाधव, पो.हवा. रोकडे, पो. हवा. मयुर सुर्यवंशी, पो. हवा. चेतन गायकवाड, पो.ना. शेख, पो. ना. शेळके, मपोना. दिशा खेवलकर, पो.शि. नितीन जगदाळे, पो.शि. योगेश मांढरे, पो.शि. शेख, पो.शि. युवराज कांबळे व पो. शि. दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.



