तेजधार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

संपादकीय

सरन्यायाधीशांवर हल्ला पुण्यात वकिलांचे आंदोलन

पुणे : भारताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचे निषेधार्थ महाराष्ट्र बहुजन लॉयर्स ऑर्गनायझेशन यांच्या वतीने पुणे जिल्हा न्यायालयात निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.

पुणे : भारताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचे निषेधार्थ महाराष्ट्र बहुजन लॉयर्स ऑर्गनायझेशन यांच्या वतीने पुणे जिल्हा न्यायालयात निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.
ॲड किरण कदम यांचे नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात ॲड. राहुल ढाले, ॲड. सुमेध घनवट, ॲड. अजय डोळस, ॲड. शारदा वाडेकर, ॲड. एकनाथ जावीर, ॲड राणी कांबळे, ॲड एकनाथ सुगावकर, ॲड सुचित मुंदडा, ॲड जगदीश सोनवणे, ॲड मनीष मगर, ॲड अतुल सोनवणे, ॲड. संतोष जाधव, ॲड. संघमित्रा गायकवाड, ॲड. फारिया टीनवाला, ॲड. अनिल नगराळे, ॲड. किरन सुरवाडे, ॲड. रमन घोरपडे, ॲड. विशाल सोनवने, ॲड. राज जाधव, ॲड. यशवंत गायकवाड, ॲड. प्रियंका गायकवाड, ॲड. प्रियंका खंडाळे, ॲड. जावळे, ॲड. रणखंबे, ॲड. सूरज कांबळे, ॲड विजयसिंह निकम, ॲड. विश्वजीत पाटिल, ॲड. त्रिभुवन, ॲड. अंबादास बनसोडे, ॲड. त्रिरत्ना बागुल, ॲड. शाक्य, ॲड. भड़कवाड़, ॲड. श्रुती संपकाळ, यांसह मोठ्या संख्येने वकील या आंदोलनात सहभागी झाले होते.
हल्लेखोर राकेश किशोर तिवारी याने केलेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर नसून भारतीय न्यायसंस्थेवर तसेच संविधानावर केलेला हल्ला आहे. माध्यमांनी या हल्लेखोराचे उदात्तीकरण
करू नये. हल्लेखोराने शांत डोक्याने हा हल्ला केला असून त्यामागील अदृश्य शक्तींचा देखील शोध घेऊन त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान तसेच इतर प्रचलित कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी झालेल्या सभेत सर्वच वकिलांनी केली.
त्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. महेंद्र महाजन साहेब यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले. महाजन साहेबांनी त्वरित सदरचे निवेदन मा. उच्च न्यायालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याचे निर्देश दिले. या वेळी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पुणे शहर अध्यक्ष : अमोल तुजारे तसेच बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे कार्यालयीन सचिव : अभय शेलार या वेळी उपस्थित होते.

Tezdhar News

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे