कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल चोरी व घरफोडी चोरीस प्रतिबंध करणेकामी पेट्रोलिंग करुन प्रतिबंध करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे तपास पथक अधिकारी सपोनि अनिल सुरवसे, पोहवा. अमोल हिरवे, पोशि. गणेश चिंचकर, पोशि. अभिजीत रत्नपारखी पो.ना.महेश राठोड, पोशि. जयदेव भोसले, पोशि राहुल रासगे, पो.शि. दिपक जडे, पो.शि. सुहास मोरे असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करित असताना पोलीस अंमलदार गणेश चिंचकर व अमोल हिरवे यास विश्वसनिय खब-याकडुन बातमी मिळाली की, एक मुलगा रंगाने काळा सावळा, अगांत राखाडी टि शर्ट, निळया रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेला इसम हा टिळेकरनगर, पाण्याच्या टाकीच्या परिसरात थांबलेला असुन त्याच्या हालचाली हया संशयास्पद आहे. त्याच्या कमरेला पिस्टल सारखे हत्यार लावल्या सारखे दिसत आहे. सदर भागात तो कोणाची तरी वाट पाहत आहे. तेव्हा आम्ही वरिल स्टाफसह कान्हा हॉटेल चौकात जावुन थांबलो. तेथुन दोन पंचाना सोबत घेवुन ठिळेकरनगर पाण्याच्या टाकीच्या दिशेने जावुन मिळालेल्या बातमीच्या वर्णनाच्या इसमाचा शोध घेत असता सदर इमस हा टिळेकरनगर भागातुन वन विभागाच्या दिशेने जाणा-या रोडच्या दिशेने पायी चालत जात असताना दिसले. तेव्हा सदर इसमास दि.२०.१० वा सुमारास पकडुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने सचिन संभाजी जाधव, वय ३१ वर्षे, रा. म्हाळुगे इगळे, ता.खेड जि.पुणे, मुळ रा. शेजाळे, ता. फलटन, जि. सातारा असे असल्याचे सांगीतले. त्यावेळी त्याचे झडती घेतली असता त्याचे उजव्या बाजुस कबरेला एक पिस्टल खोचलेल्या अवस्थेत दिसला. तसेच ट्रॅक पॅन्टच्या उजव्या बाजुकडील खिशात प्लॅस्टिकच्या पिशवीत ५ जिवंत राऊण्ड मिळाले. त्याच्याकडे परवाना आहे? अगर कसे याबाबत चौकशी केली असता त्याने सदर अग्नीशस्त्र परवाना त्याच्याकडे नसल्याचे सांगुण त्याच्या विरुध्द फलटण पोलीस ठाणे येथे पुर्वीचे गुन्हे दाखल असुन सदर गुन्हयामधील तक्रार यांच्याकडुन धोका होण्याची शक्यता असल्याने त्याच्या भितीपोटी जवळ बाळगले असल्याचे सांगितले आहे. त्यावेळी त्यास अटक करुन अटक मुदतीत त्याच्याकडे आणखी अग्नीशस्त्र व जिवंत कातडुसे आहे, अगर कसे याबाबत विचारपुस केली असता त्याने पिसर्वे, ता पुरदंर, जि पुणे येथे राहणारा मित्र सागर काळुराम वायकर, वय २४ वर्षे, धंदा शेती, याच्याकडे आणखीन एक अग्नीशस्त्र व २ जिवंत राऊण्ड दिले असल्याचे सांगितले सदर इसमाला सासवड येथुन ताब्यात घेवुन त्याच्याकडुन आणखीन एक अग्नीशस्त्र व २ जिवंत राऊण्ड जप्त करुन त्यास ही दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. अश्याप्रकारे वरिल दोन्ही आरोपी यांच्याकडुन ८०,०००/- रु कि दोन पिस्टल व १२००/- रु कि ७ जिवंत राऊण्ड जप्त करण्यात आली आहे.
सदर इसमाच्या विरुध्द कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन.८२२/२०२२ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर व सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, अनिल सुरवसे, सहा. पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.
सदर कामगिरीबाबत मा. पोलीस आयुक्त सो अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे कौतुक केले आहे.



