विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत महीलेची वेश्या व्यवसायातून विमानतळ पोलीसांनी केली सुटका
पुणे शहर प्रतिनिधी
विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विदेशी तसेच इतर राज्यातील महिलांकडून सेक्स रॅकेट चालवणार्या एजंटला पकडून पिडीत महीलेची वेश्या व्यवसायातून विमानतळ पोलीसांनी केली सुटका
विमानतळ पोलीस स्टेशन पुणे येथे नेमणुकीस असलेले पो. ना. सचिन जाधव यांना त्यांच्या खबऱ्यांमार्फत गोपनीय माहिती मिळाली की, साकोरे नगर परिसरात एक इसम हा खाजगी वाहनातून काही मुलींना वेश्या व्यवसायासाठी घेऊन फिरत आहे त्यास फोन द्वारे संपर्क केल्यानंतर त्याच्या जवळ असलेल्या मुलींना वेश्या व्यवसायासाठी तो ग्राहकांना हॉटेल मध्ये महीला उपलब्ध करून त्यातून मिळणाऱ्या रकमेचा अर्धा हीस्सा स्वत घेऊन त्यावर स्वत ची उपजीविका चालवत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस स्टेशन हद्दीतील साकोरे नगर परिसरामध्ये सार्वजनिक रोडवर एजंट हा ०४ महीलांसह दोन वेगवेगळ्या रिक्षातून घेऊन आल्यावर त्यास पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या मदतीने छापा टाकून पकडण्यात आले त्यावेळी सदर इसमाकडे एकुण चार महीला आल्या असून त्यापैकी एक महीला ही उज्बेकिस्तान या देशातील रहवासी तसेच एक महीला नेपाळ, दिल्ली व एक महीला ही मुंबई येथील रहिवासी असल्याची खात्री पटली आहे. छापील कारवाई मध्ये आरोपी कडून दोन मोबाईल रु. ५,०००/- रोख रक्कम कंडोम बाॅक्स व इतर १,९२,०५०/- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीने स्वत च्या फायद्यासाठी संबंधीत महीलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून आरोपी विरूद्ध विमानतळ पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मंगेश जगताप हे करत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री रोहीदास पवार पोलीस उपायुक्त, परिमंडळ ४ पुणे शहर तसेच श्री किशोर जाधव, सहायक पोलीस आयुक्त, येरवडा पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भरत जाधव, पोलीस निरीक्षक श्री मंगेश जगताप, महीला पोलीस उपनिरीक्षक, मंगल जोगन, पो. ना. प्रदीप मोटे, पो. ना. गणेश गायकवाड, पो. शि. रूपेश तोडकर, मपोना कांबळे, मपोना बुऱ्हाडे यांनी केली.



