तेजधार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

राहुलजी गांधी यांच्या शुभहस्ते बोधी व्रुक्षाचे व्रुक्षारोपण करण्यासाठी पुणे शहर व जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांच्या मातीचे संकलन

पुणे : भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या शुभहस्ते बोधी व्रुक्षाचे व्रुक्षारोपण करण्यासाठी पुणे शहर व जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांची माती एका कलक्षामध्ये ऐतिहासिक स्थळी जाऊन जमा करण्यात आली

भारत जोडो यात्रेदरम्यान खासदार श्री. राहुलजी गांधी यांच्या शुभहस्ते बोधी व्रुक्षाचे व्रुक्षारोपण करण्यासाठी पुणे शहर व जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांची माती एका कलक्षामध्ये ऐतिहासिक स्थळी जाऊन जमा करण्यात आली, या ऐतिहासिक स्थळांमध्ये पुण्यातील काँग्रेस भवन, लाल महल, महात्मा फुले वाडा ( समता भूमी ) आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक, हुतात्मा स्मारक, ना. गोखले स्मारक, ऐतिहासिक टिळक वाडा, सिंहगड किल्ला , तळेगाव दाभाडे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मुर्ती स्थळ, संगमवाडी येथील आद्यक्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक, भिमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभ, तसेच वडू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी स्थळ या सर्व स्मारकांमधील मातीचा कलश पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष श्री. अरविंदभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा कलश श्री. राहुलजी गांधी यांना प्रधान करण्यात येणार आहे..आजच्या या कार्यक्रमाप्रसंगीश्री अरविंद भाऊ शिंदे,अँड. अभयजी छाजेड, सुजीत आप्पा यादव, सौ. संगिताताई तिवारी, सचिन आडेकर, सुनिल शिंदे, सौ, रजनीताई त्रिभुवन, विजय खळदकर, अजित जाधव, रविंद्र आरडे,राजेश शिंदे, सचिन सुडगे, राहूल तायडे, अमर गायकवाड, संदिप कांबळे, ईश्वर गायकवाड, इत्यादि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते..!!

Tezdhar News

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे