तेजधार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षण

श्री संत नामदेव माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

अमोल तुजारे

महर्षीनगर येथील श्री संत नामदेव माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता पुणे महानगरपालिकेच्या शाळेत अशा प्रकारे प्रथमच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले या मेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी व शिक्षकांनी मार्गदर्शन केले या मेळाव्याचे सुत्र संचालन रमेश जाधव यांनी केले.
या मेळाव्यात सहभागी झालेल्या माजी विद्यार्थी व शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला अशा प्रकारे प्रथमच मेळावा आयोजित केलेल्या आयोजकांचे आभार मानले या सारखे कार्यक्रम आयोजित होणे आवश्यक आहे २७ वर्षांतून पुन्हा एकदा शाळेत येण्याचा योग आला त्यामुळे अनेक विद्यार्थी शालेय शिक्षणाची आठवण झाली व पुन्हा ते दिवस आठवले या मुळे खरच अनेकांना आनंदाश्रू अनावर झाले.

Tezdhar News

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे