तेजधार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

“शिस्तभंग प्रकरणी पुणे शहर पोलिस दलातील पोलिस निरीक्षक निलंबीत,

अमोल तुजारे

पुणे : तेजधार न्यूज – पोलीस निरीक्षक निलंबित| कर्तव्यात कसूर केल्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी बदलीकेल्यानंतर त्यांविरूध्द महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात (मॅट) Maharashtra Administrative Tribunal (MAT) Mumbai दाद मागण्यासाठी गेलेल्या पोलिस निरीक्षकास चांगलाच फटका बसला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी बदली केलेल्या ठिकाणी हजर न होता, थेट मॅट कोर्टामध्ये अर्ज करून शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी मॅट कोर्टानेच संबंधित पोलिस निरीक्षकावर तात्काळ शिस्तभंग कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. मॅट कोर्टाचे आदेश प्राप्त होताच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलिस निरीक्षक रवींद्र मानसिंग कदम यांना निलंबीत केले आहे.

निलंबनाची कारवाई झालेले पोलिस निरीक्षक रवींद्र कदम हे यापुर्वी चंदननगर पोलिस ठाण्यात कर्तव्यास होते. त्यांनी कर्तव्यात कसुरी केल्यामुळे त्यांची वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी चंदनगर पोलिस ठाण्यातून दंगा काबू पथकामध्ये बदली केली होती. त्यानंतर कदम हे दंगा काबू पथक येथे हजर होणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी बदलीविरूध्द तात्काळ मॅट कोर्टात धाव घेतली. निरीक्षक कदम यांनी बदलीविरूध्द मॅटकोर्टात दाखल केलेलाच अर्ज कोर्टाने रद्द केला आणि त्यांच्या बेशिस्त वर्तनाबाबत ताशेरे ओढले.

मॅटने (MAT Court) निरीक्षक कदम यांच्याविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनास दिले होते. न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांना शुक्रवारी निलंबीत केले आहे.

Tezdhar News

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे